एक लाख व्यक्तींनी घेतला मद्य परवाना ; ठीक ठिकाणी पोलिसांचा राहणार चोख बंदोबस्त
जळगाव :- सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी तरुणाईसह आबालवद्धांनी जय्यत तयारी केली आहे. तर दुसरीकडे जिल्हाभरातून एक लाख नागरिकांनी एक दिवसाचा मद्य परवाना घेतला आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त राहणार असून पहाटे पाच वाजेपर्यंत बिअर बार व हॉटेल उघडे राहणार आहेत. जळगाव जिल्हा पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी 31 डिसेंबर साठी चोख नजर ठेवून आहेत.
ठिकठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी विशेष पार्ट्यांचे आयोजन केले असून यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
दि. ३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर ‘वन डे परमिट ‘साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात एक लाख जणांनी एक दिवसासाठीचा मद्यपरवाना (विदेशी मद्यासाठी पाच तर देशीस्वठी दोन रुपये फी) घेतला आहे.
थर्टी फस्र्टच्या पाश्र्वभूमीवर जिल्हातील ३५ पोलीस दाण्यामध्ये त्यांच्या हद्दीत दोन ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे तसेच शहरी भागात अधिक ठिकाणी पोतिसंचा बंदोबस्त लावला जाणार असून जळगाव शहरामध्ये १५ ते १६ दिकाणी शहनांची तपासणी केली जाईल. ड्रंक अँड ड्राईव्ह व भरधाव वेगाने वाहने चालविणा-यांवर देखील पंलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.
जिल्ह्यात १ हजार १०० पोलीस अंगलदार, २० पोलीस अधिकारांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. नाकाबंदी दरम्यान, बीथ अनलायझरने वाहन चालकांची तपासणी केली जाणार आहे. तसेव ज्याठिकाणी हे उपलब्ध नाही त्याठिकाणी रुग्णालयात जावून त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.