Sunday, June 15, 2025
Homeक्राईमदुचाकीवरून आलेल्या भामट्याने महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबविले 

दुचाकीवरून आलेल्या भामट्याने महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबविले 

दुचाकीवरून आलेल्या भामट्याने महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबविले 

जळगाव शहरातील घटना

जळगाव प्रतिनिधी

दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातून 32 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना शनिवारी सदोबा नगरातील मातृभूमी चौकात रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

शहरातील जूना नशिराबाद रोडवरील सदोबा नगरात शितल दर्शन पाटील (वय ३२) या राहायला असून त्या जेवणानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास शतपावली करीत असताना दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना  शनिवारी २२ रोजी रात्री त्या जेवण झाल्यानंतर घराजवळील हिरा पाईप रोड परिसरात घडली.

याप्रकरणी सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी  शितल पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार  दिल्यावरून अज्ञात चोरट्यावरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून. तपास उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहे.

ताज्या बातम्या