Sunday, June 15, 2025
HomeBlogदरोड्याच्या तयारीत असणारी सात जणांची टोळी पकडली

दरोड्याच्या तयारीत असणारी सात जणांची टोळी पकडली

दोन गावठी कट्टे, चार काडतूस, चाकू, तलवारी, फायटर हस्तगत; भुसावळ बाजार पेठ पोलिसांची कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी) :-मोठा घातपात करण्याच्या तयारीत असणाऱ्या सात जणांच्या टोळीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, प्रत्येकी चार जिवंत काडतूस, तलवारी, चाकू, आणि फायटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की 8 रोजी रात्री सव्वा 8 वाजेच्या सुमारास भुसावळ नागपूर हायवे जवळ असलेल्या आलिशान वॉटर पार्क च्या मागील बाजूस मोकळ्या जागेत काही जण पिस्तूलसह अन्य घातक शस्त्रांसह गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पथक तयार करून या सात जणांना ताब्यात घेतले .त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, चार काडतूस, चार तलवारी, चार चाकू, एक फायटर जप्त करण्यात आले.

यांना केली अटक

या कारवाईत इमरान शेख उर्फ मॉडेल रसूल शेख रा. भारत नगर भुसावळ, अरबाज शेख शबिर. तेली गल्ली भुसावळ, शोएब इकबाल खाटीक रा. फैजपूर, आदित्य सिंग उर्फ विकी अजय ठाकूर रा.खंडवा, राहुल उर्फ चिकूराम डेंडवाल रा खंडवा, मोहित जितेंद्र मेलावन्स, यांना अटक करण्यात आले असून त्यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, हवालदार महेश चौधरी, सोपान पाटील, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, राहुल वानखेडे आदींनी ही कारवाई केली. याबाबत तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.

ताज्या बातम्या