Sunday, June 15, 2025
Homeक्राईमतरुणाने गळफास घेत संपविले जीवन...! 

तरुणाने गळफास घेत संपविले जीवन…! 

तरुणाने गळफास घेत संपविले जीवन…! 

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव तालुक्यातील वाकडी येथे एका २१ वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार, १३ मे २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत आहे.मयत तरुणाचे नाव अमोल वाल्मीक पाटील (वय २१, रा. वाकडी, ता. जळगाव) असे आहे.

अमोल हा आपल्या आई-वडील आणि दोन भावांसह वाकडी गावात राहत होता. त्याचे वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर अमोल शेतीच्या कामात वडिलांना मदत करायचा. सोमवारी, १२ मे रोजी रात्री जेवणानंतर अमोल शेताकडे गेला होता. मात्र, तो घरी परतला नाही. सकाळी गावकऱ्यांना त्याच्या शेतालगतच्या दुसऱ्या शेतात कडुनिंबाच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत अमोल आढळला.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर अमोलला मृत घोषित केले.

या घटनेने कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला चटका लावणारा होता. तरुणाच्या निधनाने वाकडी गावात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्याचे काम सुरू होते.

ताज्या बातम्या