Friday, June 13, 2025
Homeक्राईमतब्बल १५ दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

तब्बल १५ दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

तब्बल १५ दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी
विविध ठिकाणांहुन दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरलेल्या १५ दुचाकी हस्तगत केल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांशी बोलतांना दिली .

जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या वाहत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, छाविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी चोरीच्या घटना उघडकीस आणून अरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानु‌सार, उपविभागीय
पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील गुन्हे शोध पथकाने कार्यवाही सुरू केली होती. संशयित विक्की भालेराव हा चोरीची मोटार सायकल घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील पोहेकों प्रदीप चौधरी यांना मिळाली , त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना विल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचान्यांचे पथक तयार केले

खाक्या दाखविताच दिली कबुली गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक राहुल तावडे, चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, विकास सातदिवे, रतन गिते, राहुल घेते, योगेश बारी आणि योगेश घुगे यांच्या पथकाने संशयित विक्की भालेराव गा दुचाकी चोरट्याच्या ताब्यात घेतले, त्याची कसून चौकशी केली असता, त्याने शहर, जिलहां पेठ, रामानंद नगर, एमआयडीसी आणि मोहाडी (धुळे जिल्हा) परिसरातून १५ मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी लाच्याकडून १५ दुचाकी हस्तगत केल्या.

ताज्या बातम्या