Wednesday, November 19, 2025
Homeक्राईमजानेवारीत जळगाव महापालिका निवडणुकीचा बिगुल; ११ नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत, २ डिसेंबरला अंतिम...

जानेवारीत जळगाव महापालिका निवडणुकीचा बिगुल; ११ नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत, २ डिसेंबरला अंतिम आरक्षण जाहीर

जानेवारीत जळगाव महापालिका निवडणुकीचा बिगुल; ११ नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत, २ डिसेंबरला अंतिम आरक्षण जाहीर

प्रतिनिधी | जळगाव

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या उलटगणतीला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून, जानेवारी महिन्यात निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.

या कार्यक्रमानुसार ३० ऑक्टोबरपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत आरक्षित जागांची संख्या निश्चित करून संबंधित प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीबाबतची अधिकृत सूचना प्रसिद्ध होईल.

११ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष आरक्षणाची सोडत काढली जाईल आणि निकाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल. त्यानंतर १७ नोव्हेंबरला प्रारूप आरक्षण प्रसिद्ध केले जाईल, तसेच नागरिक आणि पक्षांकडून हरकती नोंदविण्यासाठी २४ नोव्हेंबर ही अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे.

२५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत प्राप्त हरकतींचा निपटारा करण्यात येणार असून, २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षणाचा कार्यक्रम राजपत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे.

राज्यातील सर्व महापालिकांबरोबरच जळगाव महापालिका निवडणुकीकडेही आता राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले असून, येत्या काही दिवसांत निवडणूक रंगत आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या