गर्दीचा फायदा घेत शिक्षिकेची बस मधून मंगलपोत लांबविली
यावल प्रतिनिधी
बस मधून प्रवास करणाऱ्या एका शिक्षिकेची 64 हजार रुपयाची मंगल पोत लांबविण्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील विरावली येथून योगेश्वरी नारायण धनगर (वय ४५) या शिक्षिका एसटी बसद्वारे यावल येथे येत होत्या. दरम्यान, गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील ६४ हजारांची सोन्याची मंगलपोत अज्ञात चोरट्याने चोरी करुन पोबारा केला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात योगेश्वरी धनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सहा. फौ. हेमंत सांगळे करत आहेत.