Wednesday, April 29, 2026
Homeसामाजिकओंकारेश्वर मंदिरात उद्या महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

ओंकारेश्वर मंदिरात उद्या महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

ओंकारेश्वर मंदिरात उद्या महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी शहरातील श्री ओकारेश्वर मंदिरात बुधवार दि. २६ रोजी महाशिवरात्री महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार असून मंदिर परीसर सुशोभित केला आहे.

पहाटे ४ वाजता दर्शनार्थ मंदिर उघडण्यात येणार असून संपूर्ण दिवस शिवअभिषेक पूजनाचा कार्यक्रम होईल. पहाटे ५ ते ७. द्वितीय पर्व १० ते १२, तृतीय पर्व दुपारी ४ ते ६ प्रदोषकाल, प्रथम पर्व रात्री ७ ते ९, द्वितीय पर्व रात्री १० ते १२, तृतीय पर्व रात्री १ ते ३, चतुर्थ पर्व पहाटे ४ ते ६ अशा ७ विशेष पर्वामध्ये शिव अभिषेक पूजनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे.

दुपारी १२ वाजता अभिजित मुहूर्ताला, सायंकाळी गोरज मुहूर्ताला ६ वाजता १०८ निरंजन्याद्वारे महाआरती होईल. रायपूर येथील उद्योगपती व छत्तीसगड राज्याचे पारीख समाजाचे अध्यक्ष मुकेश पारीख व परभणी सुजीत जोशी यांच्या हस्ते अभिषेक होईल. मंदिर व परीसरात विद्युत रोषणाई केली आहे. संध्याकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत श्री सत्संग भजन मंडळाकडून शिवभजन होईल.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या