Thursday, April 16, 2026
Homeजळगाव जिल्हाइनरव्हील क्लब जळगावची वृद्धाश्रमास भेट

इनरव्हील क्लब जळगावची वृद्धाश्रमास भेट

इनरव्हील क्लब जळगावची वृद्धाश्रमास भेट

जळगावप्रतिनिधी – ‘इनरव्हील डे’ निमित्त वृद्धाश्रमामधील आजी-आजोबांशी संवाद साधून त्यांच्यासोबत वेळ घालविता यावा यासाठी इनरव्हील क्लब जळगावचे अध्यक्ष उषा जैन यांच्यासह सदस्यांनी सावखेडा शिवारातील मातोश्री आनंदा आश्रमाला भेट दिली. सचिव निशिता रंगलानी, सीसी रंजन शाह, प्रोजेक्ट चेअरमन नूतन कक्कड व क्लब सदस्यांची उपस्थिती होती. नुतन कक्कड यांनी भोजनाची व्यवस्था करुन दिली. सर्व सदस्यांनी आजी-आजोबांसोबत भोजन केले. मातोश्री आनंदाश्रमाला एक महिना पुरेल एव्हढे किराणा साहित्य इनरव्हील क्लबच्या सदस्यांकडून देण्यात आले. प्रोजेक्टसाठी नूतन कक्कड यांच्या परिवाराचे अनमोल सहकार्य लाभले. यासाठी तृप्ती चौबे, तनुजा मोरे, मेघना जीवराजानी, ज्योस्ना रायसोनी, प्राजक्ता वैद्य, लीला अग्रवाल, साधना गांधी, सुनीता जैन, मीना लुनिया, डॉ. रितु कोगटा, रोहिणी मोरे, नीता जैन, राजश्री पगारिया, संध्या महाजन यांनी सहकार्य केले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या