अमळनेर : रस्त्याने महिला पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी 20 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत डिस्काउंट फवारा केल्याची घटना 17 रोजी सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास गुरुकृपा कॉलनीत घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुकृपा कॉलनी मध्ये राहणाऱ्या रत्ना किशोर देसले (वय ४५) या सायंकाळी बाजार समितीच्या भिंतीमागील रस्त्याने जात होत्या. या वेळी अचानक दोन मजबूत बांध्याचे २० वर्षाच्या आतील तरुण काळा रंग व लाल पट्टेवाली दुचाकीवर आले. त्यांनी रत्ना देसले यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावून नेली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.