Saturday, August 2, 2025
Homeताज्या बातम्यामद्यप्रेमींसाठी खुशखबर. : थर्टी फर्स्टला पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी !

मद्यप्रेमींसाठी खुशखबर. : थर्टी फर्स्टला पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी !

मुंबई वृत्तसंस्था :– राज्यात यंदा नाताळ सण आणि नव वर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करता येणार आहे. राज्याच्या गृहविभागाने दिलेल्या नव्या आदेशानुसार दिनांक  25 आणि 31 डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, परमिट रूम्स, आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे , नाशिक नागपूर सारख्या शहरात यंदाचा ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट दणक्यात साजरा होणार असल्याचे दिसत आहे.

मद्य विक्रीसाठी विशेष वेळापत्रक :
वाईन शॉप्स : मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार
बीअर बार : पहाटे 5 वाजेपर्यंत खुले राहणार
आउटडोअर म्युझिक कॉन्सर्ट – , 25 आणि 31 डिसेंबरला रात्री 12 वाजेपर्यंतच आउटडोअर संगीत मैफलींसाठी परवानगी असेल.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार चालकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे नागरिकांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत आपल्या मित्रमंडळींसोबत सेलिब्रेशन करण्याची संधी मिळणार आहे.

पोलिसांकडून या काळात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्यास कडक मनाई करण्यात आली असून, ट्रॅफिक पोलिसांच्या पथकांकडून तपासणी केली जाणार आहे.

ताज्या बातम्या