Wednesday, July 30, 2025
HomeBlog१७ वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल...

१७ वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल…

१७ वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल…

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील घटना

भुसावळ प्रतिनिधी I घराच्या छताला साडी ने गळफास घेऊन एका सतरा वर्षीय तरुणीने केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार 24 जानेवारी रोजी वरणगाव जवळील पुलगाव मधील पुष्पलता नगर मध्ये उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.संजीवनी दांडगे (वय १७) असे मयत तरुणीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फुलगाव येथील पुष्पदलाता नगर मध्ये विलास राजाराम दांडगे हे वास्तव्याला असून त्यांची मुलगी संजीवनी दांडगे हिने शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजे पूर्वी छताच्या पंख्याला साडी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली,

तरुणीने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून ती वरणगाव येथील गांधी महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती., संजीवनी तिने आत्महत्या केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर तिला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश उगले यांनी  मृत घोषीत केले.

याप्रकरणी विलास दांडगे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास स.पो.नि. जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामदास गांगुर्डे, गणेश राठोड, ईश्वर तायडे करत आहेत.

ताज्या बातम्या