Saturday, August 2, 2025
Homeक्राईमनिलेश कोळी याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई ; ठाणे कारागृहात रवानगी

निलेश कोळी याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई ; ठाणे कारागृहात रवानगी

कासोदा, ता. एरंडोल एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील नीलेश कोळी याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करुन त्याची ठाणे येथील माध्यवर्ती कारागृहात कासोदा पोलिसांकडून रवानगी करण्यात आली आहे.

कासोदा पोलीस ठाणे हद्दीतील उत्राण गु.ह. येथील नीलेश भिला कोळी (वय ३०) याच्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गैर कायद्याने वागणे, मारहाण, मालमत्तेचे नुकसान, साथिदारांसह गौण खनिजाची चोरी, विनयभंग आदी गुन्हे दाखल होते. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून ही त्याच्या स्वभावात बदल झाला नाही. नीलेशला विविध गुन्ह्यांमध्ये अटक केल्यानंतर न्यायालयाकडून जामिनावर सुटल्यावर पुन्हा तो तेच गुन्हे करत होता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण होऊन गावातील लोकांच्या मनात असुरक्षिततेची

भावना तयार झाली होती. त्यामुळे अधिनियम सन १९८१ नुसार धोकादायक व्यक्ती या संज्ञात मोडत असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या सूचनेनुसार नीलेश कोळी याच्याविरुद्ध स.पो. नि. नीलेश राजपूत व पो.हे. कॉ. नरेंद्र गजरे यांनी प्रस्ताव तयार करून अधीक्षकांकडे पाठवला होता. या प्रस्तावाची पडताळणी करून जिल्हा पोलीस अधीक्षकांनीजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता.

ताज्या बातम्या