Saturday, August 2, 2025
Homeक्राईमनक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला ; सुरक्षा दलाचे वाहन उडविले, ९ जवान शहीद

नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला ; सुरक्षा दलाचे वाहन उडविले, ९ जवान शहीद

विजापूर वृत्तसंस्था :-छत्तीसगड मधील विजापूर येथे नक्षलवाद्यांनी आज दुपारी  आय ईडीने जवानांच्या वाहनावर स्फोट घडवून या भ्याड हल्ल्यामध्ये 9 जवान शहीद झाले. ही घटना कुटरू रोडवरील बेद्रे येथे ही  घडली. शहीद जवान ऑपरेशन करून परतत होते ज्यात ५ नक्षलवादी ठार होते.

बस्तरचे आयजी म्हणाले की, विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाद्वारे गाडी उडवून दिली. यात डीआरजीचे ८ जवान आणि एका ड्रायव्हरसह ९ जणांचा मृत्यू झाला . दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर येथील संयुक्त कारवाईतून ते परतत होते.नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या पिकअप वाहनाला लक्ष्य केले.

बस्तरचे आयजी म्हणाले की, डीआरजी दंतेवाडाचे जवान दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरच्या संयुक्त कारवाईनंतर परतत होते. विजापूर जिल्ह्यातील बेद्रे-कुटरू रोडवर हा स्फोट झाला.

ताज्या बातम्या