नाशिक वृत्तसंस्था :- येथील जिल्हा रुग्णालयातून अज्ञात महिलेने आठ दिवसांचे बाळ चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या अनोळखी महिलेचा पोलीस कसून शोध घेत आहे.
मूळ रा. मध्य प्रदेश व हल्ली ठेंगोडा (ता. सटाणा) येथे वास्तव्यास असलेल्या सुमन अब्दुल मोहम्मद कलीम (२३) या विवाहितेस २८ डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयातदाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर गोंडस मुलगा दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर गोंडस मुलगा जन्मास आल्याने सुमन आणि अब्दुल या दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतानाच बाळ चोरीला गेल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रसूतीनंतर बाळ आणि बाळंतिणीला पीएनसी वॉर्डात हलवण्यात आले होते. या ठिकाणी शस्त्रक्रिया झालेल्या सुमनसह बाळावर उपचार करण्यात येत होते.
बाळ चोरीस गेल्याचे समजताच रुग्णालयात खळबळ उडाली. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश आव्हाड, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील सीसीटीव्हीची पाहणी करुन महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला रुग्णालयात येताना डोक्याला रुमाल बांधुन येत असल्याने शोध घेण्याचे पोलीसांसमोर आव्हान आहे.