पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या पॉडकास्ट मुलाखतीची सर्वत्र चर्चा
नवी दिल्ली Í वृत्तसंस्था आपल्या पहिल्या फोरकास्ट मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी जगातील युद्ध परिस्थिती, राजकारणातील तरुणांचा प्रवेश, पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममधील फरक यावर मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी “चुका माझ्याकडूनही होतात, मी माणूस आहे, देव नाही”, असंही म्हटलं आहे. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या या वक्तव्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.
पॉडकास्ट दरम्यान,निखिल पंतप्रधान मोदींना विचारतात की, जर एखाद्या तरुणाला नेता व्हायचं असेल, तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या पारखल्या जाऊ शकतात? या प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान मोदी म्हणतात की, चांगले लोक राजकारणात येत राहिले पाहिजेत. असे लोक आले पाहिजेत, जे फक्त महत्त्वाकांक्षा घेऊन नाही, तर ध्येय घेऊन येतात. पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात की जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी भाषण दिलं. तेव्हा मी जाहीरपणे म्हटलं होतं की, ‘चुका होतात.’ माझ्या बाबतीतही असं घडतं. मी देखील एक माणूस आहे, देव थोडी आहे.
तुम्ही लहानपणीच्या मित्रांच्या टच मध्ये आहात काय ? या प्रश्नावर मोदी बालपणाच्या दिवसात हरवले, ते म्हणाले की माझी केस थोडी विचित्र आहे. खूप लहान वयात मी घर सोडले होते. घर म्हणजे सर्वकाही सोडले होते. कोणाशी काही संपर्क नव्हता. खूप मोठा गॅप पडला.कोणाशी काही घेणे देणे नव्हते. मला वाटायचे कोणी मला का विचारेल. माझे जीवन एका भटकत्या माणसासारखे झाले होते.
जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या अनेक इच्छा जागृत झाल्या. माझे एक इच्छा होती की सगळ्या वर्गमित्रांना सीएम हाऊसला बोलवावे. त्यामागे माझा हेतू असा होता की कोणी मला असे बोलू नये की आता मुख्यमंत्री झाला…मोठा माणूस झाला आहे. तीस मार खान बनला आहे. मी त्यांना सांगू इच्छीत होतो की आहे तसाच आहे.जो गाव सोडून गेलेला. मी लहानपणीचे ते क्षण जगू इच्छीत होतो.त्या मित्रांना भेटू इच्छीत होतो. परंतू ते खूपच वयस्कर झाले होते. सगळ्यांची मुले खूप मोठी झाली होती. सगळ्यांची केस पिकले होते. त्यामुळे त्यांना मी ओळख शकलो नाही.’
मी सर्वांना बोलावले, एकूण ३० ते ३५ मित्र आले. सर्वांनी रात्री जेवण घेतले. गप्पा मारल्या. जुन्या आठवणींना उजाळा दिला.परंतू मला जास्त आनंद झाला नाही, कारण मी दोस्त शोधत होतो. परंतू चे सर्व जण माझ्याशी आदराने बोलत होते. त्यांना मी मुख्यमंत्री दिसते होतो.
पॉडकास्टमध्ये, निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींना जगात सुरू असलेल्या युद्धाबद्दलही प्रश्न विचारला. जगात काय चाललं आहे याची काळजी आपण करावी का? असा प्रश्न निखिलने पंतप्रधानांना विचारला. जगातील वाढत्या युद्धांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सातत्याने म्हणत आलो आहोत की आम्ही तटस्थ नाही आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असं पंतप्रधान म्हणाले.
एकूणच निखील कामथ यांनी घेतलेल्या या मुलाखतीत हे सर्व प्रश्न विचारण्यात आले असून, याचा निवडक भाग सध्या ट्रेलर म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कोण आहेत निखील कामथ?
निखिल कामथ हे एक भारतीय स्टॉक ब्रोकर आणि यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी २०१० मध्ये झेरोधाची स्थापना केली. झेरोधा स्टॉक, कमोडिटीज, म्युच्युअल फंड, बाँड आणि चलनांमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग सेवा देते. निखिलाने त्यांचा मोठा भाऊ नितीन कामथ याच्यासोबत झेरोधाची सुरूवात केली. झेरोधाचे १ कोटी क्लायंट आहेत, ज्यामुळे ते देशातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज फर्मपैकी एक बनले आहे. ते रेनमॅटरचे संस्थापक देखील आहे. २०२४ च्या फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत निखिल यांचाही समावेश होता आणि फोर्ब्सनुसार, त्याची एकूण संपत्ती $३.१ अब्ज आहे. निखिल कामथ हे ट्रू बीकनचे सह-संस्थापक देखील आहेत, त्यांनी २०२० मध्ये ते सुरू केले. ट्रू बीकन ही एक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे जी अति-उच्च-निव्वळ-वर्थ असलेल्या व्यक्तींना भारतीय बाजारपेठेत खाजगीरित्या गुंतवणूक करण्यास मदत करते.
मार्च २०२३ मध्ये, निखिलने ‘पीपल बाय डब्ल्यूटीएफ’ पॉडकास्ट सुरू केला. आतापर्यंत त्यांनी तन्मय भट, किरण मजुमदार-शॉ, सुनील शेट्टी, रितेश अग्रवाल, रॉनी स्क्रूवाला आणि इतर अनेक मोठ्या व्यक्तींसोबत पॉडकास्ट केले आहेत.