Sunday, June 15, 2025
Homeजळगाव जिल्हाभंगार, पाईप चोरी प्रकरणात मोकाट ; मुख्य सूत्रधाराला पोलिसांचे पाठबळ

भंगार, पाईप चोरी प्रकरणात मोकाट ; मुख्य सूत्रधाराला पोलिसांचे पाठबळ

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आ. राजूमामा भोळे यांची कारवाईची मागणी

जळगाव : शहरातील महानगरपालिकेच्या भंगार व पाईप चोरी प्रकरणांमध्ये मुख्य सूत्रधार अद्यापही फरार का ? तसेच त्याला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे ? सूत्रधाराला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी विधानसभेमध्ये केली आहे.

 

आमदार राजूमामा भोळे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये याविषयी शासनाचे लक्ष वेधून घेतले. जळगाव शहरात पाईप चोरी प्रकरण गाजत आहे. या प्रकरणांमध्ये काही जणांना अटक झाली असली तरी मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सूत्रधारांना पाठीशी घालत गुन्हा नोंदवत असताना खाडाखोड केली आहे. अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.

ब्रिटिशकालीन पाईपलाईन व भंगार चोरी प्रकरणात मुख्य सूत्रधाराला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे ? अशा सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आ. राजूमामा भोळे यांनी केली.

ताज्या बातम्या