Thursday, May 7, 2026
HomeBlogप्रभाग १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका; आमदार सुरेश भोळे व गुलाबराव देवकर...

प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका; आमदार सुरेश भोळे व गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत मतदारांशी संवाद

प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका; आमदार सुरेश भोळे व गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत मतदारांशी संवाद

​जळगाव: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांनी सोमवारी आपल्या प्रचाराचा जोरदार श्रीगणेशा केला.

रायसोनी नगरातून प्रचाराला सुरुवात करताना उमेदवारांनी प्रथम विश्वेश्वर महादेवाचे मनोभावे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले आणि प्रभागातील मतदारांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मतदारांशी संवाद साधताना आमदार सुरेश भोळे यांनी महायुतीच्या माध्यमातून प्रभागाचा कायापालट होईल, असा विश्वास व्यक्त करत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या नागरी समस्या प्रशासनाशी समन्वय साधून प्राधान्याने मार्गी लावल्या जातील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. प्रचारादरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी आमदार भोळे आणि महायुतीच्या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार, नवनिर्वाचित नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, वैशाली अमित पाटील यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी महायुती सदैव कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी नेत्यांनी दिले, ज्यामुळे प्रभाग १३ मधील राजकीय वातावरण महायुतीच्या बाजूने पूर्णपणे तापल्याचे पाहायला मिळाले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या