1 कोटी 60 लाखाहून अधिक भाविकांचे संगमावर स्नान
नवी दिल्ली प्रयागराज गंगा, यमुना आणि अदृश्य स्वरूपातील सरस्वतीच्या संगमावर सोमवारी पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत १ कोटी ६० लाखांहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महाकुंभ भारताच्या सनातन वारशाचे प्रतीक असल्याचे नमूद करत सर्व भाविक आणि पर्यटकांना शुभेच्छा दिल्या. मंगळवारी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर कुंभमेळयात सहभागी झालेले १३ आखाड्यांचे साधू-संत, महंत यांचे अमृत स्नान होईल.
सोमवारी संगमावर आलेल्या भाविकांच्या या अथांग सागरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. भाविकांना मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवक तैनात आहेत. याशिवाय
सुरक्षेसाठी हजारो सुरक्षा कर्मचारी डोळ्यातील घालून खडा पहारा देत आहेत, जारी सुरक्षा कर्मचारी डोळयांत तेल घालून खडा पहारा देत आहेत. या महाकुंभासाठीसुमारे एक कोटी लोक वास्तव्य करू शकतील, अशी तात्पुरती कुंभनगरी बसवण्यात आली आहे.तात्पुरत्या स्वरूपात वसविण्यात आलेली ही सर्वात मोठी नगरी आहे