Sunday, October 5, 2025
Homeखानदेशमालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी सुट्टीच्या दिवशी कार्यालय दीड वाजेपर्यंत सुरू राहणार 

मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी सुट्टीच्या दिवशी कार्यालय दीड वाजेपर्यंत सुरू राहणार 

जळगाव प्रतिनिधी

मनपाच्या सर्व प्रभाग समिती कार्यालय हे नागरिकांना मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील दीड वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त धनश्री शिंदे यांनी दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी मालमत्ता कराची थकत रक्कम भरावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरातील मालमत्ता धारकांकडे २०० कोटी पेक्षा अधिक कर थकीत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सुखसुविधा पुरवितांना मनपाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणूननागरिकांनी तातडीने थकीत कर व चालू वर्षाचा कर भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने उपायुक्त धनश्री शिंदे यांनी केले आहे. तसेच शनिवार व रविवारी शासकीय सुटी असतांना देखील त्या दिवशी नागरिकांना कर भरता यावा याकरीता शनिवार व रविवार रोजी दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये भरणा सुरु ठेवण्यात येणार आहे.

 

ताज्या बातम्या