Thursday, June 12, 2025
Homeताज्या बातम्याएअरगन घेऊन दहशत माजविणाऱ्या एकाला अटक

एअरगन घेऊन दहशत माजविणाऱ्या एकाला अटक

साथीदाराकडून गावठी पिस्तूल हस्तगत, एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी I ;- शहरातील सुप्रीम कॉलनी येथील तलाव परिसरात एअरगन घेऊन दहशत माजविणाऱ्या एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्ट्या सारखी दिसणारी एअरगन हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचा दुसरा साथीदार याची घराची झडती घेतली असता एक गावठी पिस्तूल आढळून आले मात्र त्याचा साथीदार फरार झाला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्राने दिलेली माहिती अशी की एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना शुभम अनंता राऊत वय 21 रा. भगवा चौक सुप्रीम कॉलनी हा स्वतःजवळ बाळगून परिसरात दहशत पसरवीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, छगन तायडे, गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर, यांच्या पथकाने सुप्रीम कॉलनीतील तलाव परिसरात शुभम राऊत याची अंग जडती घेतली असता एअरगन मिळून आली. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र बंटी तायडे. तायडे गल्ली याच्याकडे एक पिस्तूल दिल्याची माहिती दिली मात्र बंटी तायडे हा मिळून आला नाही. त्याच्या घराची झडती घेतली असता एक गावठी बनावटीची पीस्टल पंचांसमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध आर्म ॲक्ट कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राऊत याला अटक करण्यात आले आहे तर त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह योगेश घुगे करीत आहे.

ताज्या बातम्या