Saturday, August 2, 2025
Homeजळगाव जिल्हाराज्यात थंडीचा जोर वाढला!

राज्यात थंडीचा जोर वाढला!

पुणे वृत्तसंस्था : राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला असून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील अनेक शहरांच्या तापमानाचा पारा खाली उतरला आहे.शनिवारी राज्यात सर्वात कमी तापमान (अहमदनगर)अहिल्यानगर येथे ७.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दरम्यान, पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडी कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे.

पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी कमी-अधिक होत आहे. तरीही त्या भागातून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे राज्यातून गायब झालेली थंडी परतली आहे. तसेच आकाश निरभ्र असल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा वाढला आहे. काही भागात धुक्याची चादर पसरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शनिवारी हवामान कोरडे होते.

ताज्या बातम्या