“बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला धमकीचा ईमेल; तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही”
मुंबई – बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या टॉवर इमारतीत बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली. घटनास्थळी बॉम्ब स्क्वॉड आणि स्थानिक पोलीस तात्काळ दाखल झाले, मात्र सखोल तपासानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
ही धमकी ‘कॉम्रेड पिनारायी विजयन’ नावाच्या ईमेल आयडीवरून आली होती. मेलमध्ये लिहिण्यात आले होते की, “टॉवर बिल्डिंगमध्ये चार आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवण्यात आले असून, ते दुपारी ३ वाजता स्फोट होतील.”
या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३५१(१)(ब), ३५३(२), ३५१(३) आणि ३५१(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा माग काढण्यासाठी तपास सुरू केला आहे.