Saturday, August 2, 2025
Homeताज्या बातम्यानेपाळसह दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले !

नेपाळसह दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले !

नवी दिल्ली वृत्तसंस्था :- नेपाळसह देशाचा उत्तर भाग भूकंपाच्या धक्क्यांनी आज सकाळी हादरला.  उत्तर प्रदेश, बिहारपासून दिल्लीपर्यंत लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ सीमेजवळील तिबेट असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर  ७.१ इतकी नोंदवण्यात आली आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६  वाजून ३५  मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. तिबेटमधील झिझांग भाग हा या भूकंपाचे केंद्र होते. एएनआय या वृत्तसंस्थेने भूकंपाचे काही व्हिडिओ फुटेज जारी केले आहेत.

पश्चिम बंगालच्या सिलीगुडी, जलपाईगुडी, कूचबिहारमध्ये हा भूकंप झाला. तर बिहारची राजधानी पाटणा व्यतिरिक्त इतर काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

दिल्ली, नोएडा, गाझियाबादसह एनसीआरमधील लोकांमध्ये भूकंपामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं. पहाटेच्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे लोकांची झोप उडाली. घाबरूल लोक घराबाहेर आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

ताज्या बातम्या