Wednesday, July 30, 2025
HomeBlogपाडळसरे येथे ३२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पाडळसरे येथे ३२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पाडळसरे येथे ३२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील पाडळसरे गावात ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (९ जुलै) दुपारी उघडकीस आली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सोपान महारु कोळी (वय ३२, रा. पाडळसरे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते मासेमारी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी सकाळी त्यांच्या पत्नी कामावर गेल्यानंतर ते घरच्या वरच्या मजल्यावर एकटेच होते.

दुपारी दीड वाजेच्या सुमारास सोपान यांना कामावर बोलवण्यासाठी त्यांचा भाऊ वडीलांना घेऊन आला. आई वर जाऊन पाहते तर त्यांनी झोक्याच्या दोरीने गळफास घेतल्याचे दृश्य दिसून आले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रवीण पारधी करत आहेत.

ताज्या बातम्या