Friday, August 1, 2025
Homeक्राईमगावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवणाऱ्या तिघांना अटक

गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवणाऱ्या तिघांना अटक

जळगाव :  पिंप्राळा हुडको परिसरात कमरेला गावठी पिस्तूल लावून परिसरात दहशत माजविणाऱ्या तिघांच्या रामानंद नगर पोलिसांनी केली असून तरुणांकडून तीन गावठी पिस्तुलासह तीन जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात तीन जण गावठी पिस्तूल लावून परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई कारण्याच्या सुचना दिल्या. पथकाने सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६

वाजता कारवाई करत संशयित आरोपी कल्पेश उर्फ प्रवृध्द गुलाब सपकाळे (वय २१ रा. हुडको), गौरव समाधान सोनवणे (वय २१ रा. गॉलेक्सी कॉलनी) आणि लिलाधर देवीदास कोळी (वय ३५ रा. हिराशिवा कॉलनी) यांना अटक केली. त्यांच्याकडून ७५ हजार रूपये किमतीचे तीन गावठी पिस्तूल आणि तीन जीवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे.

ताज्या बातम्या