Saturday, October 4, 2025
Homeआरोग्यनवरात्री उपवास विशेष : उपवासाच्या दिवशी ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी कोणते हेल्दी ड्रिंक...

नवरात्री उपवास विशेष : उपवासाच्या दिवशी ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी कोणते हेल्दी ड्रिंक घ्याल?

🌸 नवरात्री उपवास विशेष : उपवासाच्या दिवशी ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी कोणते हेल्दी ड्रिंक घ्याल? 🌸

सणावारांच्या काळात अनेक महिला आणि पुरुष उपवास करतात. उपवास करताना दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहणे तितकेच आवश्यक असते. अनेकजण दिवसभर फक्त पाणी पितात, परंतु यामुळे अशक्तपणा, थकवा आणि डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही हेल्दी ड्रिंकचे सेवन फायदेशीर ठरते.

उपवासात उपयुक्त हेल्दी ड्रिंक

१. ताक
ताक हे शरीराला ताजेतवाने ठेवणारे उत्तम पेय आहे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि पचन सुधारते. साबुदाणे, भगर किंवा इतर उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानंतर ताक घेतल्यास ते सहज पचते. ताकामध्ये काळे मीठ आणि भाजलेले जिरे टाकल्यास ऍसिडिटीपासूनही आराम मिळतो.

२. नारळ पाणी
नारळ पाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचा उत्तम स्त्रोत आहे. यात पोटॅशियम आणि खनिजे असल्याने शरीर हायड्रेट राहते आणि तात्काळ ऊर्जा मिळते. थकवा किंवा डिहायड्रेशन जाणवत असल्यास नारळ पाण्याचा चांगला फायदा होतो.

३. लिंबू सरबत
लिंबाच्या रसात विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. लिंबू पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते आणि वजन कमी करण्यास मदत करते. उपवासात लिंबू सरबत घेतल्यास शरीर हलके व ताजेतवाने राहते.

🌟 उपवासाचे फायदे

वजन नियंत्रणात राहते.

रक्तातील साखरेचे प्रमाण सुधारते.

मेंदूची कार्यक्षमता वाढते.

अल्झायमर सारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

🔔 महत्त्वाची सूचना

कोणताही उपवास सुरू करण्यापूर्वी तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, विशेषतः जर एखादी वैद्यकीय समस्या असेल तर.

ताज्या बातम्या