Saturday, October 4, 2025
Homeखानदेश।। आत्मोत्कर्ष वाणी ।। 'धर्मसाधनेत निपूण होण्यासाठी जिज्ञासा  वाढवा!' - प.  पू....

।। आत्मोत्कर्ष वाणी ।। ‘धर्मसाधनेत निपूण होण्यासाठी जिज्ञासा  वाढवा!’ – प.  पू.  डॉ. इमितप्रभाजी म. सा.

।। आत्मोत्कर्ष वाणी ।।

‘धर्मसाधनेत निपूण होण्यासाठी जिज्ञासा  वाढवा!’
– प.  पू.  डॉ. इमितप्रभाजी म. सा.

जो मनुष्य आत्म्याला व शरीराला एक मानतो त्याला बद्ध म्हणतात. मिथ्यार्थ मोह त्याच्यात असतो. तर जी व्यक्ती आत्मा व शरीर वेगळे मानतो बोधप्राप्त असल्याची अनुभूती घेतो त्याला बुद्ध म्हणतात. तर जी आत्मा सत्कर्म करत नाही, चांगला विचारांपासून दूर जाते तिला धर्मराधनेचा पाठ शिकवणे म्हणजे शुद्ध आचरण करण्यासारखे होय. शुद्ध आत्मातून धर्माचा प्रभाव वाढतो व पुरूषार्थ घडून धर्मसाधनेत निपूणता येते आणि मनुष्यसुद्धा सिद्ध पुरूष होत असतो असे विचार श्रावक-श्राविकांसमोर  प. पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी व्यक्त केले.

आपल्या चांगल्या कर्मामुळेच सुख प्राप्ती होत असते. सुख प्रवृत्त विचारसरणी असलेल्यांना सुख प्राप्त होते तर असुख वृत्ती असलेल्यांना दु:ख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. जो मनुष्य कुठल्याही आत्माला पवित्र करण्यास प्रोत्साहन देतो त्याला पुण्य प्राप्त होते. अठरा प्रकारचे पाप त्याच्याकडून नाहिसे होतात. तर पाच कारणांमुळे निर्माण होणारी हिंसा सुद्धा त्याच्याकडून होत नाही; मनुष्य कर्तव्य व न्याय करतानाही विवेकशील राहतो आणि दुसऱ्यांचे दु:ख आपले समजतो त्यालाच अहिंसक म्हणावे. यातूनच ते संयमी होऊन साधक ठरत असल्याचे श्रावक-श्राविकांना प.पू.निलेशप्रभाजी म.सा. यांनी सांगितले.

ताज्या बातम्या