Saturday, October 4, 2025
Homeक्राईमनेहरू नगरात वृद्धाच्या घरातून ३५ हजारांचे दागिने लंपास

नेहरू नगरात वृद्धाच्या घरातून ३५ हजारांचे दागिने लंपास

नेहरू नगरात वृद्धाच्या घरातून ३५ हजारांचे  दागिने लंपास

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नेहरू नगर परिसरात एका वृद्धाच्या घरातून तब्बल ३५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी (दि. १७ सप्टेंबर) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहरू नगरातील ७० वर्षीय पदमसिंग रामलाल राजपूत आपल्या परिवारासोबत राहतात. बुधवारी रात्री दीडच्या सुमारास ते घराबाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडी उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी थेट वरच्या मजल्यावरील मुलीच्या बेडरूममधील लाकडी कपाट फोडून त्यात ठेवलेले चांदीचे दागिने पळवले.

चोरी गेलेल्या ऐवजामध्ये लहान मुलांच्या हातातील चांदीचे कडे, तीन जोड, क्रिस्टलचे मोकळे साडे तसेच पायातील पैंजण असा ऐवज असून त्याची एकूण किंमत ३५ हजार रुपये इतकी आहे.

चोरीची माहिती समजताच कुटुंबीयांनी गुरुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो.उ.नि. चंद्रकांत धनके करीत आहेत.

ताज्या बातम्या