Saturday, October 4, 2025
Homeसामाजिकसर्वपित्री अमावस्या : भगवान शिवाला अर्पण करा या ५ वस्तू

सर्वपित्री अमावस्या : भगवान शिवाला अर्पण करा या ५ वस्तू

सर्वपित्री अमावस्या : भगवान शिवाला अर्पण करा या ५ वस्तू

पितरांचे आशीर्वाद, समृद्धी व शांततेसाठी विशेष पूजेचे महत्त्व

जळगाव (प्रतिनिधी) : पितृ पक्षाचा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे पितृ अमावस्या. या दिवशी मृत्यूची तारीख अज्ञात असलेल्या सर्व पूर्वजांचे स्मरण केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने पितर प्रसन्न होतात, जीवनातील अडचणी दूर होतात आणि घरात समृद्धी नांदते.

भगवान शिव हे विश्वपिता आणि आत्म्यांचे मुक्तिदाता मानले जातात. म्हणूनच पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांना श्रद्धेने अर्पण केलेल्या वस्तू पितरांपर्यंत पोहोचतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो.

शिवपूजेत अर्पण कराव्यात या ५ वस्तू

काळे तीळ : पूर्वजांना शांती व तृप्ती मिळते.

बेळपत्र : शिवप्रसन्नतेमुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात.

गंगाजल : पितरांच्या आत्म्यांना मोक्ष व पितृदोष शांती.

संपूर्ण अक्षत : कुटुंबात सुख, शांती व समृद्धी नांदते.

पांढरे चंदन : मनःशांतीसह पितरांच्या आत्म्यांना शीतलता लाभते.

धार्मिक मान्यतेनुसार, या अर्पणांमुळे पितृ शाप दूर होऊन घरात आनंद व ऐश्वर्य नांदते. त्यामुळे पितृ अमावस्येच्या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मनाने भगवान शिवाची पूजा करणे अत्यंत मंगलकारी मानले जाते.

ही माहिती सामान्य धार्मिक माहितीवर आधारित आहे. दिव्य भरारी याची पुष्टी करत नाही.

ताज्या बातम्या