Saturday, October 4, 2025
HomeBlogस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत होण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत होण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत होण्याची शक्यता

मुंबई : राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेणार असल्याची माहिती पुढे येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका तर तिसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका पार पडण्याचे संकेत आहेत.

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या गट रचनांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून या रचनेला अंतिम मान्यता देण्याचे अधिकार आयोगाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असून गट आरक्षण व मतदार यादीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची आकडेवारी पाहिली तर एकूण महापालिका २९ (जालना व इचलकरंजी नवनिर्मित) असून सर्व महापालिका प्रशासक राजवटीखाली आहेत. नगरपरिषदा २४८ असून त्यांपैकी मुदत संपलेल्या व नवनिर्मित सर्वच नगरपरिषदा प्रशासकांच्या अखत्यारीत आहेत. राज्यात एकूण ३४ जिल्हा परिषदा आहेत. नगरपंचायतींची संख्या १४७ असून त्यांपैकी ४२ नगरपंचायती प्रशासकांच्या ताब्यात आहेत. अशा प्रकारे प्रशासक असलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची एकत्रित संख्या २२० इतकी आहे. पंचायत समित्या एकूण ३५१ असून त्यापैकी तब्बल ३३६ समित्या प्रशासकांच्या अखत्यारीत आहेत.

 

ताज्या बातम्या