Saturday, October 4, 2025
Homeखानदेशभाजप जळगाव जिल्हा महानगरची जम्बो कार्यकारिणी जाहीर

भाजप जळगाव जिल्हा महानगरची जम्बो कार्यकारिणी जाहीर

भाजप जळगाव जिल्हा महानगरची जम्बो कार्यकारिणी जाहीर

जळगाव: भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा महानगरची मोठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात १२ उपाध्यक्ष, ३४ पदाधिकारी आणि ६३ सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

ही कार्यकारिणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली घोषित करण्यात आली. भाजपचे प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी, विभाग संघटक रवि अनासपुरे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही नवी कार्यकारिणी स्थापन झाली आहे.

नवीन पदाधिकारी आणि सदस्य

कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी दिपक सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. त्यांच्यासोबत सीमा भोळे, उदय भालेराव, राजेंद्र मराठे, अशोक राठी, वंदना पाटील, भाग्यश्री चौधरी, शक्ती महाजन, दिपक परदेशी, डॉ. मनोज टोके, सागर पाटील, रेखा वर्मा आणि ज्योती निंभोरे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

याशिवाय, विशाल त्रिपाठी, भारती सोनवणे, राहुल वाघ, नितीन इंगळे आणि जयेश भावसार यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली आहे. चिटणीसपदी नितू परदेशी, अजय डोहाळे, सचिन बाविस्कर, संदीप तेले, गोपाल पोपटाणी, पितांबर भावसार, राहुल पाटील, नंदीनी दर्जी, भूषण लाडवंजारी, आशिष सपकाळे, मिलिंद चौधरी आणि ललित बडगुजर यांची निवड झाली आहे.

विजय वानखेडे यांची कोषाध्यक्षपदी, मनोज भांडारकर यांची प्रसिद्धी प्रमुखपदी, अक्षय चौधरी यांची आय.टी. प्रमुखपदी आणि मयुर भदाणे यांची सोशल मीडिया प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या