Saturday, October 4, 2025
Homeखानदेशसालार फाउंडेशन व हैदर ग्रुपचा उपक्रम : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, ईद-ए-मिलादनिमित्त...

सालार फाउंडेशन व हैदर ग्रुपचा उपक्रम : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, ईद-ए-मिलादनिमित्त रक्तदान शिबिर

सालार फाउंडेशन व हैदर ग्रुपचा उपक्रम : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, ईद-ए-मिलादनिमित्त रक्तदान शिबिर

जळगाव  – समता नगर येथे सालार फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल आदी आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले.

हैदर ग्रुपच्या पुढाकाराने ईद-ए-मिलादनिमित्त ३१ ऑगस्ट २०२५ रोजी समता नगर येथे रक्तदान शिबिरही घेण्यात आले. या शिबिरात रेड प्लस सोसायटीने रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांमध्ये एजाज अब्दुल गफ्फार मालिक (महानगर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), संजू तडवी (पोलीस अधिकारी, रामानंद पोलीस ठाणा), इरफान सालार (सालार फाउंडेशन), शाहिद पटेल (युवा अध्यक्ष, PDD), समीर भाई, आसिफ अनवर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप बीराडे, उमर मालिक तसेच हैदर ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

रक्तदाते म्हणून समीर भाई, आकाश कराडे, फरहान शेख, प्रवीण शेंगदाणे, महेंद्र लोहार आणि संतोष लोहार यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

हा उपक्रम सामाजिक सेवा, बंधुता आणि एकता यांचा संदेश देणारा ठरला.

ताज्या बातम्या