दोन कुटुंबांमध्ये मारहाण; परस्परविरोधात गुन्हे दाखल
जळगाव : जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या भांडणात परस्परांना मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. ही घटना २४ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता तांबापुरा परिसरात घडली.
पहिली फिर्याद
या प्रकरणी संजय विनोद गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित कालिया सुलतान आणि शारुख गयासोद्दीन कवीरोद्दीन (दोघे रा. तांबापुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद
तर रिजवान गयासुद्दीन शेख (वय २७, रा. गीतम नगर, तांबापुरा) यांच्या तक्रारीनुसार संजना गोसावी आणि अमान (पूर्ण नाव उपलब्ध नाही, रा. तांबापुरा) यांच्याविरुद्धही अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपास सुरू
या परस्परविरोधी फिर्यादींवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली असून तपास पोलीस हवालदार रामदास कुंभार करीत आहेत.