Thursday, July 3, 2025
Homeताज्या बातम्याहिंदी सक्तीचा निर्णय रद्द; फडणवीस सरकारचा यु-टर्न

हिंदी सक्तीचा निर्णय रद्द; फडणवीस सरकारचा यु-टर्न

हिंदी सक्तीचा निर्णय रद्द; फडणवीस सरकारचा यु-टर्न

मुंबई, 29 जून 2025 – राज्यात हिंदी सक्तीविरोधात वाढलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा धोरणावरील दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने पावले मागे घेतली. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासूनच हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध झाला होता. आता फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये हिंदी तिसऱ्या भाषेची सक्ती होणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्या