Saturday, October 4, 2025
Homeजळगाव जिल्हाभारत-पाक युद्धात आम्ही पडणार नाही, अमेरिकेची स्पष्टोक्ती 

भारत-पाक युद्धात आम्ही पडणार नाही, अमेरिकेची स्पष्टोक्ती 

भारत-पाक युद्धात आम्ही पडणार नाही, अमेरिकेची स्पष्टोक्ती 

अमेरिकेच्या भूमिकेचा भारताला फायदा, पाकला चिंता

न्यूयॉर्क वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावादरम्यान अमेरिकेने या युद्धात न पडण्याची भूमिका घेतली आहे. पण त्याचवेळी दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन अमेरिकेचे उपरष्ट्रपती जे. डी. व्हॅन्सर यांनी केले. परंतु अमेरिकेने वादात न पडण्याची पेठलेली भूमिका भारतासाठी फायद्याची तर पाकला निंतिंत टाकणांनी असल्याचे मानले जात आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वाँना यांनी भाराराा आगि पाकमध्ये वाढत्या तणावावर भाष्य करत अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना अमेरिका नियंत्रित करू शकत नाही, परंतु अण्वस्व संपन्न अशा या दोन शेजारी देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन करू शकतो, असे वॉन्स मापाले. दोन्ही देशांतील संभाव्य अण्वरव बुद्धयावत ट्रम्प प्रशासन देखील

चिंतामन असल्याचे त्यांनी म्हटले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माकों रुबियी यांचा हवाला देत व्हॅन्स यांनी दोन्ही देशांतील तगाव लवकरात लवकर कमी व्हावा हीच अमेरिकेची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. भारताला पाकसीचत समस्या आहे. पाकनेही भारताला उत्तर दिले आहे. आम्ही या देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन करू शकतो. पण आम्ही चेट युद्धात पडणार नाही. मुळात याच्याशी आमचे काहीही देणेघेणे नाही.

दोन्ही देशांना शस्त्र टाकण्यास आम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे भोरणात्मक मागाने आम्ही या मुद्दधावर पुढे चालत राहणार असल्याचे व्हॅन्स माणाले.

भारत-फकमधील संघर्षाचे रूपांतर व्यापक प्रादेशिक युद्ध तथा अण्चरव युद्धात होऊ नये हीच आमची अपेक्षा आहे. दोन्ही देशांनी यावर धोरणात्यक मागनि तोडगा काढण्याची गरम व्हॅन्स यांनी व्यक्त केली. तसेच अण्वस्त्रांचा वापर झाल्यास ते विनाशकारी ठरू शकते. मात्र

असे काही होईल, असे आमाला वाटत नसल्याचे व्हॅन्स यांनी म्हटले, तर अमेरिकेची संघर्षात मध्ये न पडण्याची भूमिका हो भारताला पाठिंबा दाखविणारी आहे, असा दावा भारतीय-अमेरिकन उद्योगपती डॅनी गायकवाड यांनी केला.

व्हॅन्स आपल्या कुटुंबासोबत भारताचा आपत्य पहिला अधिकृत दौरा असतानाच २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादो हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर द्वारे चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील ९ दहशतवादी तळ उद्द्व्यस्त केले होते. यानंतर विधरलेल्या पाककडून सातत्याने सीमारेषेवर कुरापती सुरू असून भारतीय सैन्याकडून देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे.

ताज्या बातम्या