Thursday, May 7, 2026
HomeBlogशाळांसाठी पायाभूत सुविधा अनुदान; 22 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करा

शाळांसाठी पायाभूत सुविधा अनुदान; 22 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करा

शाळांसाठी पायाभूत सुविधा अनुदान; 22 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करा

जळगाव, – धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्यता प्राप्त अनुदानित/ विना अनुदानित/ कायम विना अनुदानित खासगी अल्पसंख्यांक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2024-25 अनुदान प्राप्त करण्यासाठी जळगांव जिल्हयातील इच्छूक शैक्षणिक संस्थांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2025 से 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ट महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अपंग शाळामध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना या अंतर्गत पात्र अल्पसंख्यांक शाळांचे प्रस्ताव सादरकरण्याची अंतिम मुदत 22 फेब्रुवारी 2025 आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. याची देखील शैक्षणिक संस्थांनी नोंद घ्यावयाची आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या