Thursday, April 30, 2026
HomeBlogचोपड्यात 15 किलो गांजा पकडला ; परभणीच्या दोघांना अटक

चोपड्यात 15 किलो गांजा पकडला ; परभणीच्या दोघांना अटक

चोपड्यात 15 किलो गांजा पकडला ; परभणीच्या दोघांना अटक

चोपडा प्रतिनिधी

शहरातील नागलवाडी रोडवरील वराड फाट्याजवळ पोलिसांनी 14 किलो 510 ग्रॅम वजनाचा सुमारे एक लाख 45 हजार रुपये किमतीचा गांजा दोन रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पकडला असून याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की रोहित संजय शेळके वय 25 रा परभणी आणि तुळशीराम कचरू आवाडे वय 20 रा परभणी हे दोघे 2  रोजी 14 किलो 510 ग्रॅम वजनाचा एक लाख 45 हजार रुपये किमतीचा गांजा सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वराळ फाट्याजवळ घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या