Sunday, October 5, 2025
Homeखानदेशपुण्यात गुलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा धोका वाढला ; दोन जणांचा मृत्यू

पुण्यात गुलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा धोका वाढला ; दोन जणांचा मृत्यू

पुण्यात गुलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा धोका वाढला ; दोन जणांचा मृत्यू

जिल्ह्यात जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर ; 17 रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर

पुणे वृत्तसंस्था

शहरासह जिल्ह्यात गुलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांची संख्या वाढली असून या आजारामुळे शहरात दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून रविवार पर्यंत एकूण रुग्णांची संख्या ही 100 च्या पुढे गेली आहे, पुण्यामध्ये 24 संशयित प्रकरण हे मागील आठवड्यात आढळले होते मात्र प्राथमिक चाचणीनंतर या संक्रमणामध्ये अचानक वाढ झाली असून मागील आठवड्यात मंगळवारी रॅपिड रिस्पॉन्स टीम स्थापन करण्यात आली होती. यात तपासणीनंतर जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली असून यामध्ये 68 पुरुष आणि 33 महिला रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सतरा रुग्ण हे व्हेंटिलेटर सपोर्ट वर असून राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने माहिती दिल्यानुसार पुणे ग्रामीण येथे 62 रुग्ण पुणे महानगरपालिकेत 19 पिंपरी चिंचवड महापालिकेत सहा व इतर जिल्ह्यातील रुग्ण आढळून आले आहेत. संक्रमण टाळण्यासाठी नागरिकांना उकळलेले पाणी, ताजे स्वच्छ शिजवलेले अन्न खाण्याचा सल्ला दिला जात आहे.

महापालिकेचा मोठा निर्णय-

आता महानगर पालिकेने जीबीएस आजाराची लागण झालेल्या रुग्णांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. GBS आजारावर पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. आतापर्यंत रुग्णांना स्वखर्चाने उपचार करावे लागत होते. यामुळे खिशाला मोठा भुर्दंड बसत होता. शिवाय, खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात होते. रुग्णांची होणारी ही हेळसांड पाहता महानगर पालिका प्रशासनाने जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे-

पायांमध्ये अशक्तपणा शरीरात थकवा येणे, चेहऱ्याच्या हालचालींमध्ये समस्या येणे, डोळे हलवण्यास त्रास होणे. वेदनेसह खाज सुटणे, लघवीवर नियंत्रण नसणे अर्धांगवायूमुळे पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. एक तृतीयांश प्रकरणांमध्ये श्वासोच्छवासावर परिणाम होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमुळे बोलणे आणि गिळणे प्रभावित होऊ शकते. गुंतागुंत वाढल्यास श्वसनक्रिया बंद पडणे किंवा हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.

गुलेन-बॅरे सिंड्रोमचे कारण-

ही एक जीवघेणी न्यूरोलॉजिकल स्थिती आहे आणि तो कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु तो सामान्यतः 30 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांना प्रभावित करतो. तज्ञांच्या मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे नेमके कारण माहित नाही, पण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, बहुतेक प्रकरणे जंतुसंवेदनशील जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गानंतर होतात. परिणामी, शरीरावरच रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला होतो. गुइलेन-बॅरे सिंड्रोम होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे कॅम्पायलोबॅक्टेर जेज्युनी या जीवाणूचा संसर्ग, ज्यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारख्या लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टेरिटिस होतो. कधी कधी, काही लसीही गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या जोखमीचे कारण होऊ शकतात, पण हे अत्यंत दुर्मिळ आहे.

ताज्या बातम्या