कानळदा येथे उच्चशिक्षित तरुणीचा हौदामध्ये बुडून मृत्यू
जळगाव प्रतिनिधी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या एका उच्चशिक्षित6 31 वर्षीय तरुणीचा गुरांच्या हौदात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 25 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रियंका रवींद्र भंगाळे वय 31 कानळदा तालुका जळगाव असे मयत तरुणीचे नाव आहे.
अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या प्रियंका हिने पुण्यात नोकरी केली होती, मात्र ती दोन वर्षांपासून गावी आली होती आणि आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. 25 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तिच्या घराच्या मागे असलेल्या गुरांच्या पिण्याच्या पाण्याच्या हौदात बुडाल्याचे आढळून आले,
तिच्या काकांनी नातेवाईकांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मयत घोषित केले.
याबाबत पोलीस पाटील नारायण पाटील यांनी तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावरून घटनास्थळी पोलिसांनी जाऊन पंचनामा केला, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.