Thursday, July 31, 2025
Homeखानदेशनाशिकच्या पालकमंत्री पदाविषयी 'देवा'लाच ठाऊक !

नाशिकच्या पालकमंत्री पदाविषयी ‘देवा’लाच ठाऊक !

नाशिकच्या पालकमंत्री पदाविषयी ‘देवा’लाच ठाऊक !

गिरीश भाऊ महाजन यांच्या मिश्किल विधानाची नाशकात चर्चा

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री स्थगिती दिल्याने आता हा प्रश्न कधी निकाली निघतो हे देवालाच ठाऊक असे मिश्किल विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.

महायुती मधील चर्चेअंती पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.दरवर्षी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये शासकीय महापूजा होते. यंदा नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती असली तरी गिरीश महाजन यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला.

महापूजा विधी नंतर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी  संवाद साधला त्यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाचा प्रश्न कधी सुटणार याविषयी मला काही माहिती नाही ते ‘देवा’लाच माहिती असेल असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या