Sunday, October 5, 2025
Homeक्राईमजळगावात 'द बर्निंग कार’चा थरार !

जळगावात ‘द बर्निंग कार’चा थरार !

जळगावात ‘द बर्निंग कार’चा थरार !

कार जळून खाक ; मनपाच्या अग्निशामक दलाने आणली आग आटोक्यात

जळगाव प्रतिनिधी I एका कारला आज सकाळी आठ वाजता सुमारास अचानक आग लागून कार जळून खाक झाल्याची घटना लांडोर खोरी उद्यानाजवळील मोहाडी रोडवर घडली.

महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या बंबांनी आग विझवली. यात कार मालकाचे लाखोचे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही,

आदर्श नगर परिसरातील रहिवासी गुरमीर सिंग यांच्या चारचाकीला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. गाडीवर अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात गोंधळ उडाला होता,

मिळालेल्या माहितीनुसार, गुरमीर सिंग हे त्यांच्या गाडीमध्ये प्रवास करत असताना अचानक गाडीला आग लागली. या घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले ,

ताज्या बातम्या