हॉकी स्पर्धेत गोदावरी स्कूलच्या विद्यार्थीना रोप्य पदक
जळगाव येथे जिल्हास्तर नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर करण्यात आले. या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलने उल्लेखनीय कामगिरी बजावली. १५ वर्षाखालील मुलांच्या मुलींच्या संघाने उत्तम खेळ सादर करून विजेतेपद व १७वर्षाखालील मुलींच्या संघाने उत्तम खेळ सादर करून रोप्यपदक पटकावले आपल्या नावे केले आहे. या दोन्ही संघाला मयूर पाटील मार्गदर्शन लाभले. या कामगिरीमुळे गोदावरी स्कूलच्या प्राचार्या सौ. नीलिमा चौधरी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले. संघाचे कौतुक सर्वत्र होत असून विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरच उत्कृष्ट खेळाची परंपरा जपली आहे.