Saturday, October 4, 2025
Homeक्राईमवृद्ध महिलेच्या गळ्यातून धूम स्टाईल सोनसाखळी लांबवली ; दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा...

वृद्ध महिलेच्या गळ्यातून धूम स्टाईल सोनसाखळी लांबवली ; दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

वृद्ध महिलेच्या गळ्यातून धूम स्टाईल सोनसाखळी लांबवली ; दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : मंदिरातून घरी परतणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोनपोत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरीने ओढून नेली. ही घटना दि. २६ रोजी रात्री सातच्या सुमारास टिळक नगरातील प्रतीक क्लासेससमोरील गल्लीत घडली.

खोटे नगर परिसरातील गुजरात पेट्रोल पंप परिसरात असणाऱ्या सुखदा मयुरेश्वर कॉलनीत राहणाऱ्या शारदा अर्जुनराव जाधव (वय ७६) मंदिरात जाऊन परतत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्यावर धाड टाकली. त्यांनी गळ्यातील सोनपोत खेचून घेताच जाधव यांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

घटनेची माहिती कळताच जाधव यांच्या कुटुंबीयांनी तातडीने तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून सपोनि अनंत अहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या