Saturday, October 4, 2025
Homeक्राईमरिक्षात प्रवाशांना लुटणाऱ्या गँगचा लागला सुगावा ; रिक्षाचालक चोरटा वाहनासह ताब्यात

रिक्षात प्रवाशांना लुटणाऱ्या गँगचा लागला सुगावा ; रिक्षाचालक चोरटा वाहनासह ताब्यात

रिक्षात प्रवाशांना लुटणाऱ्या गँगचा लागला सुगावा ; रिक्षाचालक चोरटा वाहनासह ताब्यात

दोन साथीदारांचा शोध सुरू ; एलसीबीच्या पथकाची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) : रिक्षात प्रवास करणाऱ्या नागरिकाची २५ हजार रुपयांची रोकड चोरून फरार झालेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून ३ हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा मिळून १ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उर्वरित दोघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

फिर्यादी सद्दाम हुसेन बागवान (रा. भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास ते जळगाववरून भुसावळकडे येत असताना रिक्षातील दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या खिशातील रोकड रक्कम लंपास केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने जळगाव येथील शाहूनगर भागातील शोयब हमीद खान (वय २५) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कबुली देत आपल्या साथीदार प्रधुम्न उर्फ बंटी नंदू महाले (रा. खंडेराव नगर, जळगाव) व टोनी (रा. पिंप्राळा) यांच्यासह चोरी केल्याचे सांगितले. अटकेतील आरोपीकडून त्याच्या वाट्याला आलेले ३ हजार रुपये आणि प्रवासी रिक्षा असा एकूण १ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासात आरोपी शोयब खान याने यापूर्वीही जळगाव तालुका हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सध्या उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरु असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ अक्रम शेख, विजय पाटील, उमाकांत पाटील, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, पोना किशोर पाटील, पोकॉ प्रशांत परदेशी, रवींद्र कापडणे, तसेच तांत्रिक सहाय्यक पोकॉ पंकज खडसे, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी सहभाग घेतला.

ताज्या बातम्या