Saturday, October 4, 2025
Homeजळगाव जिल्हाराज्यात ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर ; जळगावचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी...

राज्यात ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर ; जळगावचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले

राज्यात ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर ; जळगावचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले

जळगाव प्रतिनिधी : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या यादीत जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर पुणे जिल्ह्याचे अध्यक्षपद देखील सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे. सातारा जिल्ह्यात मात्र अध्यक्षपद ओबीसी (महिला) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण – प्रमुख जिल्ह्यांचा आढावा :

ठाणे : सर्वसाधारण (महिला)

पालघर : अनुसूचित जमाती

रायगड : सर्वसाधारण

रत्नागिरी : ओबीसी (महिला)

नाशिक : सर्वसाधारण

धुळे : मागास प्रवर्ग (महिला)

नंदुरबार : अनुसूचित जमाती

जळगाव : सर्वसाधारण

अहमदनगर : अनुसूचित जमाती (महिला)

पुणे : सर्वसाधारण

सातारा : ओबीसी (महिला)

सांगली : सर्वसाधारण (महिला)

सोलापूर : मागास प्रवर्ग

कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला)

छत्रपती संभाजीनगर : सर्वसाधारण

बीड : अनुसूचित जाती (महिला)

लातूर : सर्वसाधारण (महिला)

अमरावती : सर्वसाधारण (महिला)

अकोला : अनुसूचित जमाती (महिला)

यवतमाळ : सर्वसाधारण

नागपूर : ओबीसी

वर्धा : अनुसूचित जाती

भंडारा : मागास प्रवर्ग

गोंदिया : सर्वसाधारण (महिला)

चंद्रपूर : अनुसूचित जाती (महिला)

गडचिरोली : सर्वसाधारण (महिला)

निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद – नवी दिल्ली

दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने देशव्यापी सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीसाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद नवी दिल्ली येथे घेतली. इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसी अँड इलेक्टोरल मॅनेजमेंट (IIIDEM) येथे झालेल्या या परिषदेला निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीरसिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी उपस्थित होते. या वेळी राज्यनिहाय मतदारसंख्या, मतदार यादीचे डिजिटायझेशन आणि मागील मोहिमांचा आढावा घेण्यात आला.

ताज्या बातम्या