राज्यात पुढील काही दिवस कोसळधार! अवकाळी पावसाचा इशारा
या जिल्ह्यांचा येलो अलर्टमध्ये समावेश
मुंबई वृत्तसंस्था
राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून, अनेक भागांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
३१ मार्च: येलो अलर्ट
आज (३१ मार्च) ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१ एप्रिल: संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता
१ एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, संभाजीनगर, बीड, जालना, बुलडाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२ एप्रिल: संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस
२ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम चक्रवाताच्या प्रभावामुळे राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.
विदर्भात तापमानाचा पारा चढला!
तर दुसरीकडे, राज्यातील उच्चतम तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे. चंद्रपूरमध्ये तब्बल ४२°C तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही पारा ४०°C च्या वर गेला आहे: