माशीने लिहिला गोल्फरच्या नशिबाचा अध्याय; टॉमी फ्लीटवूडला १७ कोटींचं बक्षीस
नशिबाची साथ असेल तर चमत्कार घडतात, हे आपण नेहमी ऐकतो. पण अमेरिकेतील मॅरिलँडच्या केव्स वॅली गोल्फ क्लबमध्ये प्रत्यक्षात असा चमत्कार घडून आला. एका छोट्याशा माशीने ब्रिटिश गोल्फर टॉमी फ्लीटवूडच्या आयुष्याचा इतिहासच बदलून टाकला.
https://www.instagram.com/reel/DNxoGvZ5uis/?igsh=MW9keXluYTdwcWo3eA==
बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टॉमीने सात अंडरने सुरुवात करताना अप्रतिम शॉट मारला. बॉल सरळ होलाच्या दिशेने गेला पण तो अगदी कडेला थांबला. काही क्षणांसाठी टॉमीला वाटलं की सुवर्णसंधी हुकली. मैदानातही प्रेक्षकांनी श्वास रोखून पाहिलं.
तेवढ्यात चमत्कार झाला! बॉलवर एक माशी येऊन बसली आणि हलक्या हालचालीतून ती पुढे सरकली. बॉल हलला, संतुलन सुटलं आणि तो सरळ होलात जाऊन पडला. काही सेकंदात नशिबाने फ्लीटवूडला हसतंय हे स्पष्ट झालं.
पीजीएच्या 10 सेकंदांच्या नियमानुसार हा शॉट वैध ठरला आणि फ्लीटवूड विजेता घोषित झाला. त्याने केवळ चॅम्पियनशिपच जिंकली नाही तर तब्बल १७ कोटी रुपयांचं बक्षीस देखील पटकावलं. सोशल मीडियावर त्याने या विजयाचं श्रेय “त्या छोट्याशा माशीला” दिलं असून हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
न्यूयॉर्क पोस्टने या घटनेचं विश्लेषण केलं असून “एका मिलीग्राम वजनाची माशी खरंच बॉल हलवू शकते का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. पण न्यूयॉर्क सिटी कॉलेजचे प्राध्यापक मिचियो काकू यांनी फिजिक्समधील “टिपिंग पॉइंट” सिद्धांत मांडला. त्यानुसार, एखादी मोठी वस्तूही अगदी छोट्या झटक्याने हलू शकते.