Saturday, October 4, 2025
Homeक्राईममातोश्री गोदावरी आई पाटील यांचे यांचे ९१ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन

मातोश्री गोदावरी आई पाटील यांचे यांचे ९१ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन

मातोश्री गोदावरी आई पाटील यांचे यांचे ९१ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन

उद्या, सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार

जळगाव प्रतिनिधी I समाजसेवा, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सुभाष पाटील आणि प्रमिला पाटील यांच्या मातोश्री श्रीमती गोदावरी आई पाटील यांचे आज दुपारी १.३४ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटील परिवारासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

गोदावरी आई पाटील यांचा शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभाव समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्कारांमुळेच पाटील कुटुंबाला आणि गोदावरी फाउंडेशनला मोठी उभारी मिळाली. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचे पार्थिव आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत अंतिम दर्शनासाठी गोदावरी हॉस्पिटल, भास्कर मार्केट, जळगाव येथे ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर उद्या, सकाळी ११ वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथे अंतिम संस्कार केले जातील. समाजसेवा व शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अप्रत्यक्ष योगदान कायम स्मरणात राहील, असे अनेकांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या