मंडळाधिकाऱ्यांच्या दुचाकीची चावी काढत वाळूचे ट्रॅक्टर नेले पळवून
जळगाव : वाळूचे ट्रॅक्टरचा पाठलाग करीत असतांना दुचाकीवरुन आलेल्या देविदास बबन ढेकळे (रा. आदर्श नगर) याने मंडळधिकाऱ्यांच्या दुचाकीचा पाठलाग करीत थांबवले. त्यांच्या दुचाकीची चावी काढून ट्रॅक्टर चालकाला पळून जाण्यास मदत केली. ही घटना दि. १३ रोजी सकाळी साडेनऊ वाजता मोहाडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा परिसराचे मंडळ अधिकारी हेमंत विश्वनाथ मारुडे हे दि. १३ रोजी प्रांतअधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशानुसार तलाठी रविना पवार, माणिकराम बोपचे यांच्यासोबत सकाळी साडेनऊ वाजता मोहाडी, धानोदा कडे खासगी दुचाकीने अवैध गौणखनिजची वाहतुक करणाऱ्यांवर कारवाईसाठी जात होते. यावेळी मोहाडीकडून जळगावकडे वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर त्यांना जातांना
दिसले. त्यांनी लागलीच ट्रॅक्टरचा पाठलाग सुरु केला. यावेळी देविदास ढेकळे याने त्यांच्या दुचाकीला आडवे येवून ट्रॅक्टर पकडण्यापासून अडथळा निर्माण केला.
मंडळअधिकाऱ्यांच्या दुचाकीची काढली चावी
मंडळधिकारी यांनी ढेकळे याला आमच्या दुचाकीच्या मध्ये का येत आहे अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने मंडळधिकारी यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. तेवढ्या वेळात अवैध वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर तेथून पळून गेले.
संशयित देविदास बबन ढेकळे याने मंडळअधिकारी यांच्या दुचाकीची चावी काढून घेतल्यामुळे ट्रॅक्टवर पळून जाण्यास मदत केली. त्यामुळे संशयिताविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.